ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला”, फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर, म्हणाले, “तुचमंच भूत आहे ते…”

मुंबई : (Sanjay Raut On Devendra Fadnavis) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून शनिवारी २४ जून रोजी देशातले १५ हून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांनी मोट बांधली आहे. यावेळी पक्षातील प्रमुख नेत्यांची बिहारमधल्या पाटण्यात बैठक पार पाडली. उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करीत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला परिवार वाचवण्यासाठी विरोधकांची आघाडी तयार करण्यात येत आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावरून सातत्याने भाजपाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीची चर्चा करत होते, हे पाहून आश्चर्य वाटलं.

प्रश्नाला प्रतिउत्तर नाही देईल ती शिवसेना कसली, खासदार संजय राऊत म्हणाले. फडणवीसांना इतकंच सांगेन की, काश्मीर हा हिंदूस्थानचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतः मेहबुबा मुफ्तींबरोबर अडीच वर्ष सरकार चालवलं आहे. त्या सरकारमध्ये तुम्ही होता. मुफ्ती यांच्या शपथविधीला स्वतः पंतप्रधान उपस्थित होते. त्यामुळे अशी सडकून टीका करताना जरा जपून करा. आम्ही नवाज शरीफांचा केक कापायला कधी गेलो नाही, किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. उगाच तोंडाच्या वाफा दवडू नको. तुमचंच भूत आहे ते आणि तुमचंच पाप आहे, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये