‘हा बाबासाहेबांचा अपमान नाही का?’ केतकीचा ‘त्या’ व्हिडिओतून सडेतोड प्रश्न

पुणे : (Ketaki Chitale Post On Dr. Babasaheb Ambedkar) सोशल मीडियावर आपल्या परखड भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच वादामुळे माध्यमांच्या चर्चेत असते. समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवरुन सडेतोडपणे भूमिका मांडणारी केतकी काही झालं तरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी तिनं कोरेगाव भीमावरुन दिलेली प्रतिक्रियामुळे अनेकांच्या राग ओढावून घेतला आहे. त्यानंतर आता तिनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक पोस्ट शेयर केली असून त्या व्हिडिओतून बाबासाहेबांचा अपमान होत नाही का, असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सांगणारं ते गाणं केतकीला खटकले आहे. त्यावरुन तिनं काही प्रश्न नेटकऱ्यांना विचारले आहे. केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं, जे भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांच्याबाबत जेव्हा अशा प्रकारचं गाणं रचलं जातं तेव्हा त्याच्याविषयी कुणालाच काही वाटत नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कमाल आहे…. अशा शब्दांत केतकीनं आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. केतकी म्हणते, हा बाबासाहेब आंबेडकर, यांचा अपमान नाही का?, हा ब्राह्मण द्वेष नाही का? असा प्रश्न तिनं नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना विचारला आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. त्यातून अनेकांनी देखील अशा प्रकारच्या गाण्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने तिने कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल काहीही पोस्ट न टाकल्यामूळे तिच्यावर टिका करण्यात आली, यावर केतकीने प्रतिक्रिया दिली होती.