ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“पैज लावून सांगतो, तुमचं केंद्रातलं सरकार जाणार” संजय राऊतांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

मुंबई : (Sanjay Raut On Narendra Modi) सामान्य जनता हुकुमशहांचा पराभव करू शकते. भाजपचे लोक धमक्या, दडपशाही करत होते. कर्नाटकमधील भाजपचा पराभव देशवासीय साजरा करत आहेत. या पराभवातून दिल्लीने धडा घ्यावा. मोजकी राज्य सोडली तर भाजपकडे आता राज्ये नाहीयेत. गुजरात, उत्तर प्रदेश यावर दिल्ली जिंकता येत नाही. आम्ही भाजपच्या पराभवाचे पेढे वाटतो, सामान्य माणसाने भाजपचा पराभव केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही खेळणी आता चालणार नाही. ईडीच्या धमकीने कुणी बधणार नाही. देवेंद्रजी- मी पैज लावून सांगतो २०२४ ला मोदींचं सरकार पुन्हा सत्तेत येत नाही, अशी भविष्यवाणीच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी प्रसादरमाध्यमांशी संवाद साधताना सामान्य जनतेने खोकेवाल्यांचा केलेला हा पराभव आहे, असं त्याचं विश्लेषण केलं. लोकांना धाकात ठेवाल, दडपशाहीत ठेवायला जाल, तर लोक मतपेटीतून तुम्हाला उत्तर देतीलच, आज तेथील जनतेने भाजपचा पराभव करुन लोकशाही वाचवली असल्याचं राऊत म्हणाले.

कर्नाटकच्या भाजपच्या पराभवाचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार नाही या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर बोलताना राऊत म्हणाले, फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे. त्यांच्या संगतीला असलेल्यांना राजकारण कळत नाही. काँग्रेसच्या विजयाचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल.

काँग्रेसच्या लाटेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो पराभव झाला, त्यावर बोलताना राऊत म्हणाले, खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीला जिंकता आलं नाही, भाजपा नतद्रष्ट आहे. तिथे प्रचाराला गेले नसते तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जिंकले असते. भाजपामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार हरले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये