ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी व्हॅलेंटाईन डे दिवशी; संजय राऊत म्हणाले, “सगळं काही प्रेमानं…”

मुंबई | Sanjay Raut – राज्यातील ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) तारीख पे तारीख सुरुच आहे. आता या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवशी होणार आहे. कदाचित घटानापीठावर त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 14 फेब्रुवारीला पुढील सुनावणी निश्चित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमचं राज्यघटनेवर प्रेम आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठ सलग सुनावणी घेईल. हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं काही प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. तसंच शिवसेनेतील बंडाळी, विधानसभा अध्यक्ष निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये