ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायण राणे राज्यपाल होणार ? पाहा संजय राऊत काय म्हणाले ?

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी लवकरच पदमुक्त होणार असल्याची घोषणा केली. तेव्हापासून राजकीय हालचाली सुरु आहेत. आता त्यांच्या जागी महाराष्ट्राला कोणते नवे राज्यपाल (Maharashtra Governor) मिळणार, अशी चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) राज्यपाल होण्याची शक्यता आहे. अर्थात नारायण राणे महाराष्ट्रात नव्हे तर दुसऱ्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात. पण राणेंच्या राज्यपाल पदावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक, त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत असतात, असं काही घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू, मजा येईल.. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय..

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात वादविवाद होत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून नारायण राणे यांनी नेहमीच सेनेवर निशाणा साधला आहे. मात्र संजय राऊत यांनी यावेळी प्रथमच राणे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला.

संजय राऊत यांना मीच खासदार बनवलं, मीच पैसे खर्च केले असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरून राऊत यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एक तर खोटं बोलल्याबद्दल जनतेची माफी मागा नाही तर कोर्टात हे वक्तव्य सिद्ध करा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय. त्यामुळे नारायण राणे राज्यपाल होणार, या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये