ताज्या बातम्या

शरद पवार हे… प्रकाश आंबेडकरांचा ‘हा’ आरोप राऊतांनी फेटाळून लावला

मुंबई | वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची (Shivsena) चार दिवसांपूर्वीच युती झाली. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपचेच (BJP)cअसल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंबेडकर यांचा हा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फेटाळून लावत आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही असे ते म्हणालेत. आंबेडकर यांनी जुन्या गोष्टी विसरून आघाडी मजबूत करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी आंबेडकर यांना सल्ला दिला आहे.

चार दिवसांपूर्वी आमची युती झाली असली तरी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. आम्ही आंबेडकर भवनात युतीची घोषणा केली. प्राथमिक चर्चेत सध्या तरी शिवसेना आणि वंचित अशी चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांबद्दल अशा पद्धतीने विधानं करणं हे अजिबात मान्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणतात, शरद पवार हे देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार हे भाजपचे आहेत, असं म्हणणं हा त्यांच्या कारकिर्दीवरील मोठा आरोप आहे. ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपचं सरकार दूर ठेवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊ दिलं नसतं, असं राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काय चर्चा झाली

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना काही सल्ला दिला होता. महाविकास आघाडीत एकत्र काम करत आहेत. तर भूतकाळातील मतभेद दूर ठेवले पाहिजे, भक्कम आघाडी उभारली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगितलं होतं असे राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये