संजय राऊत उद्विग्न, पेढे वाटण्याचा दिला सल्ला!
मुंबई – Sanjay Raut Arrested : तब्बल नऊ तासांच्या तपासानंतर ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडी कार्यालयात त्यांना तपासणीसाठी नेण्यात आले आहे. कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी काही क्षण माध्यमांशी संवाद साधला. ‘मी शिवसैनिक आहे. मी यांना शरण जाणारा नाही.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
‘महाराष्ट्राला आणि शिवसेनेला कमजोर करण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, मी झुकणारा शिवसैनिक नाही. मी लढणार. शिवसेना इतकी कमजोर नाहीये. खरी शिवसेना काय आहे आज हे तुम्ही पाहताय. महाराष्ट्राला कमजोर करण्याचा दिल्लीतून प्रयत्न केला जातोय. पण महाराष्ट्र एवढा कमजोर नाहीये’ अशाप्रकारे ईडीच्या कारवाईवर राऊत यांनी केंद्रावर देखील निशाना साधला आहे.
खोट्या कारवाया करून, लोकांना धमक्या देऊन, त्यांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत ते केवळ महाराष्ट्राला आणि शिवसेनेला कमजोर करण्यासाठीच. मात्र, शिवसेना आणि महाराष्ट्र एवढा कमजोर नाहीये. आणि संजय राऊत झुकणार नाही आणि पार्टी सोडणार नाही. असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
पेढे वाट पेढे, महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा…
संजय राऊत माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी आपल्याला ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे; त्यावर काय सांगाल असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावर संजय राऊत यांनी ‘पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा… महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत पेढे वाटा. बेशरम लोक आहात तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला.’ अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी विरोधकांवर बोलताना दिली आहे.