महाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही मग तो कोणीही असो”; शिवसेनेने स्पष्टच सांगितलं!

मुंबई | राज्यसभेच्या उमेदवारीसाठी कोल्हापूरच्या (Kolhapur) छत्रपती संभाजीराजेंना (MP Sambhaji Raje) शिवसेनेने पक्षप्रवेशाची अट घातली आहे. मात्र मला महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Sambhaji Raje) यांनी त्यांना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.

आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो. आम्ही दोन जागा लढवणार असून दुसरा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल आणि तो निवडून येणार असल्याचं राऊत म्हणाले.

आम्हाला संभाजीराजेंचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता, शिवसेना दोन जागा लढवणार असून दोन जागा लढवणे हा काही अपराध नाही. महाराष्ट्रामध्ये आमचा मुख्यमंत्री आहे, सहा जागांची निवडणूक होत असल्याने दोन जागी उमेदवार देऊ आणि निवडून आणू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्या अर्थी एखादा उमेदवार निवडणूक लढवणार सांगतो तेव्हा त्याने मतांची व्यवस्था केलेली असते. ज्याअर्थी संभाजी राजे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्याअर्थी त्यांनी 42 मतांची व्यवस्था केली असणार. त्यांना कोणीतरी पाठिंबा दिला असणार अशावेळी आम्ही त्यामध्ये पडणं गरजेचं नसून ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याचं राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये