ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दावणीला बांधलेला घोडा… संजय राऊतांचा निशाणा कुणावर?

मुंबई | सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हे सगळ सुरु असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांचं एक बोलकं ट्विट जोरदार चर्चेत आहे. एरवी रोखठोक शब्दांच्या फटकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या संजय राऊत यांनी आजच्या ट्विटमध्ये चारच शब्द वापरलेत. राऊत यांचा निशाणा नेमका कुणावर आहे, यावरून आता चर्चा सुरु आहेत.

आजच्या या ट्विटमध्ये एका फोटोतून संजय राऊत यांनी नेमकं कुणाला टार्गेट केलंय, याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. या फोटोत एक काळ्या रंगाचा घोडा उभा आहे. त्याच्या गळ्यात दोरी असून ते खुर्चीला बांधण्यात आलंय. गुलामी की जब आदत पड जाती है, तो हर कोई अपनी ताकत को भूल जाता है… असं वाक्य या फोटोवर लिहिलेलं आहे.

बंडखोरी करून बाहेर पडलेले सगळे आमदार गद्दार असून हे भाजपची गुलामी करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी वारंवार केला आहे. सत्तेपायी हे भाजपचे तळवे चाटत असतात, अशी टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेते सत्तेसाठी आपली ताकद विसरून भाजपच्या दावणीला बांधले गेलेत, असा अर्थ राऊत यांना यातून अभिप्रेत असावा, अशी चर्चा सुरु आहे. आज राजकीय वर्तुळात संजय राऊत यांचं हे ट्विट जोरदार चर्चेत आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये