ताज्या बातम्यारणधुमाळी

“उत्तम शिव्या देता येत असतील तर शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना…”, राऊतांचं शिंदे गटातील आमदारांना आव्हान

नाशिक | Sanjay Raut – सध्या शिंदे गटामध्ये काय सुरु आहे, कुणाचं बिनसलं आहे याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. आता गद्दारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. त्यांच्या पिढ्यांना देखील ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर केली होती. यावर शिंदे गटातील (Shinde Group) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पलटवार केला. त्यांनी राऊतांवर टीका करताना थेट प्रसारमाध्यमांसमोर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नाही तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘मा****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं तर जनतेला आमचा निर्णय मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. लोकांनी शिवसेना-भाजप म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू” असं गायकवाड म्हणाले होते. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटातील आमदारांना आव्हान दिलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, “’गद्दार’ म्हटल्यावर मला कोणी शिव्या देत असेल तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील तर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते मंत्री यांना द्यावात. आम्ही शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल,” असं आव्हान संजय राऊतांनी शिंदे गटातील आमदारांना दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये