बंडखोर संतोष बांगरांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान! म्हणाले…
हिंगोली : (Santosh Bangar On Uddhav Thackeray) शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची पक्षविरोधी काम केल्याचं कारण देत, शिवसेनेच्या हिंगोली जिल्हा प्रमुखपदावरुन शिवसेनेकडून हाकालपट्टी करण्यात आली. यामुळं भडकलेले बांगर म्हणाले, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली. माझी कुठलीही चूक नाही त्यामुलं मला पदावरुन कोणीही हटवू शकत नाही. यांनी
दरम्यान, हाकालपट्टी केल्यानंतर बांगर यांनी शक्तीप्रदर्शनाचा निर्णय घेतला असून थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, मी पदावरुन दूर झालेलो नाही. मी आजही शिवसेनाचा जिल्हा प्रमुख आहे आणि उद्याही राहिन. उद्धव ठाकरेंची कोणीतरी दिशाभूल करत आहेत. मला त्यांना एवढचं सांगण आहे की त्यांनी दिशाभूल करणाऱ्यांना थोडसं बाजूला करावं. जे ओरिजिनल पडद्यासमोर घडत आहे ते बघण्याचा दृष्टीकोन ठेवावा.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे खरंच चांगले नेते आहात. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला आम्ही मतदान केलं आहे, आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही. आज तुम्हाला सांगतो आणखी १२ खासदार आणि ५०च्यावर जिल्हाप्रमुखांनी आम्ही शंभर टक्के तुमच्यासोबत आहोत, असं आम्हाला सांगितलंय. बाकीच्या शिवसैनिकांना जी भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती होती तीच मान्य होती.