‘आशिकी 3’मध्ये एक्स बाॅयफ्रेंडसोबत काम करणार सारा अली खान? स्पष्टीकरण देत म्हणाली, “मला तो…”

मुंबई | Sara Ali Khan – बाॅलिवूडची प्रसिद्ध स्टार कीड सारा अली खान (Sara Ali Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तसंच सारा तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती शुभमन गिलमुळे चर्चेत आली होती. तसंच आता सारा ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे ती या चित्रपटात तिचा एक्स बाॅयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aryan) काम करणार असल्याचं म्हटलं जातंय. याबाबत आता तिनं स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
‘आशिकी 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच या चित्रपटात कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. मात्र, अभिनेत्री कोण असणार? हे अद्यापही ठरलेलं नाही. पण काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन आणि साराचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर सारा आणि कार्तिक ‘आशिकी 3’ मध्ये एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर सारानं स्पष्टीकरण दिलं आहे. झूम टीव्हीशी बोलताना सारा म्हणाली की, “हा चित्रपट करायला मला आवडेल. पण अद्याप यासाठी मला विचारणा झालेली नाही.”
दरम्यान, सारानं एका मुलाखतीत तिच्या ब्रेकपबद्दल खुलासा आहे. ती म्हणाली, 2020 साल माझ्यासाठी वाईट ठरलं आहे. वर्षाची सुरवात ही माझ्या ब्रेकअपपासून झाली आहे. त्यामुळे ते आणखी पुढे वाईट ठरत गेले.”