तांबे पिता-पुत्राची एक खेळी! अन् दोघेही काँग्रेसच्या निलंबनाचे राजकीय बळी
मुंबई : (Satyajeet Tambe Suspended) विधान परिषद नाशिक पदवीधर मतदार संघातून सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अचानक माघार घेतली. या पार्श्वभुमीवर पक्षाविरोधी पाऊल उचलल्याने काँग्रेस पक्षाने (Congress) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही काँग्रेस कारवाई करणार का? याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. अखेर आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, तांबे पिता-पुत्र यांच्यावर कारवाई करुन नाना पटोले (Nana Patole) यांनी बापलेकाला काँग्रेसचा हिसका दाखवला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघातून शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे यावेळी त्यांनी जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता भाजपकडून तांबे यांना पाठिंबा जाहीर केला जाणार का? याकडे लक्ष लागले आहे. तांबे पिता-पुत्रांना आता पक्षातून निलंबित करण्यात आल्याने भाजपकडून त्यांना पाठिंबा देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येते.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अर्ज दाखल न करता पुत्र सत्यजीत यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर पक्षाने डॉ. तांबे यांना या प्रकरणाची चौकशी होऊपर्यंत पक्षातून निलंबित केले. केंद्रीय समितीने ही कारवाई केली. त्यानंतर सत्यजीत यांच्यावरही कारवाई करण्यात येणार हे नक्की होते. त्यानुसार अखेर पटोले यांनी या कारवाईची घोषणा केली आहे.