राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मंगळसूत्र…

आपल्याकडील प्रथेप्रमाणे स्त्री ही नवर्‍याच्या घरी जात असल्याने तिला जास्तीत जास्त अ‍ॅडजस्टमेंट करावी लागते; मात्र पुरुषांना तिच्या उलट पत्नीला आपल्या घरी आणायचे असल्याने तसेच कामासाठी दिवसातील बराच वेळ घराबाहेर असल्यामुळे त्याला याची गरज स्त्रीएवढी नसते.

मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्त्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे, की जेणेकरून ते घातल्यावर वाट्या बरगडी संपून पोट सुरू होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी निगडित असते. मंगळसूत्रातील वाटी ही गोलाकार घुमट (गोल पिरॅमिड) वाटीतून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते. त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढते. त्यामुळे मन शांत राहते व स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. लग्न झाल्यावर स्त्री नवर्‍याच्या घरी (स्वतंत्र अथवा एकत्र कुटुंबात) जाते. जेथे तिला सगळ्यांशी मिसळून जायचे असते. स्त्री व्यवस्थित अ‍ॅडजस्ट झाली तरच संसार नीट होतो; अन्यथा गृहकलह वाढून संसारच मोडण्याचा धोका असतो.

मंगळसूत्रातील ही वाटी अनाहत चक्रावर आल्यामुळे स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. नवीन घरात गेल्यावर स्त्रीला याची नितांत गरज असते. आत्मिक शक्ती वाढली, की तिचा प्रभाव इतरांवर (नवर्‍यासकट) पडतो. तिच्या इच्छा न सांगताच समजून घेतल्या जातात व पूर्णही केल्या जातात. तशी इच्छा त्यांना आपोआपच होते. हे आत्मिक शक्तीचे बळ आहे. तिला अनेकदा आपल्या इच्छा सांगाव्याही लागत नाहीत. हे आत्मिक शक्तीचे बळ स्त्रीला मिळावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली. हे मर्म न समजल्यामुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्र वापरत नाहीत.

समाजात संसारात कलह वाढले आहेत. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. ज्या स्त्रियांना मंगळसूत्र वापरायची इच्छा नाही त्यांनी आपल्या अनाहत चक्रावर एक इंची पिरॅमिड कायम ठेवावा. पिरॅमिडमधील शक्तीसुद्धा त्या स्त्रीचे आत्मिक बळ वाढवेल व संसार सुरळीत व्हायला मदत करेल.

आपल्या पूर्वजांनी मानसोपचारतज्ज्ञ, कौन्सिलर अशी ऑफिस न थाटता, धंदा न करता, त्याचे पेटंट न घेता सामान्य माणसांचे, स्त्रीचे, तिच्या कुटुंबाचे हित बघितले. त्यामुळे सध्याच्या पैशाच्या युगात त्यांना आपण अडाणी समजतो. मात्र त्यांनी ही प्रथा पडून अनेक पिढ्या, असंख्य कुटुंबांचे कल्याण केले आणि आपण आधुनिक शास्त्राला अनुसरताना आपले कल्याण करणार्‍या आपल्या पूर्वजांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या चांगल्या उपयुक्त प्रथांना कमी लेखतो, हेच खरे…!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये