आरोग्यदेश - विदेश

‘विज्ञान खोटे बोलत नाही, पण पंतप्रधान…

नवी दिल्ली : भारतात कोरोनामुळं झालेल्या मृत्यूची संख्या ४७ लाख आहे. असा दावा जागितक आरोग्य संघटनेनं (WHO) केला आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विज्ञान खोटं बोलत नाही. पण, पंतप्रधान मोदी खोटं बोलतात, असं राहुल गांधी म्हणाले. तसेच कोरोना काळात मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली. कोरोना महामारीत तब्बल ४७ लाख नागरीकांचा मृत्यू झाला. भारत सरकारनं जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीच्या १० पट आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे.

दरम्यान, त्यांनी १७ राज्यातील आकडेवारी जारी केली आहे. पण, जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी खोटी असल्याचं मोदी सरकारनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं डेटा कुठून मिळवला आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी कोणती पद्धती वापरली, हे आम्हाला सांगावं, असं सरकारने म्हटलं आहे. आमचा यावर आक्षेप असून आम्ही योग्य ठिकाणी आमचं मत मांडू, असंही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये