पाकिस्तानी सीमाला लागली लॉटरी; ‘या’ चित्रपटातून करणार सिनेसृष्टीतून पदार्पण, दिसणार भारतीय रॉ एजंटच्या भूमिकेत
Seema Haider – पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) भारतीय सचिन मीनाच्या (Sachin Meena) प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा पार करून थेट भारतात आली. त्यानंतर सगळीकडे या दोघांचीच चर्चा सुरू आहे. तसंच सीमा बेकायदेशीरपणे भारतात आल्यामुळे तिच्यावर संशयही व्यक्त केला जात आहे. यादरम्यान आता सीमाला हिरोईन बनण्यासाठी ऑफर मिळाली आहे. लवकरच ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
निर्माता अमित जानी यांनी सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. तर सीमासोबतच सचिन मीनालाही त्यांनी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट राजस्थानमधील टेलर कन्हैयाच्या हत्येवर आधारित आहे.
सीमा हैदरला भेटण्यासाठी जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसची टीम तिच्या घरी पोहोचली. यावेळी दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सीमाची ऑडिशन घेतली. त्यामुळे आता सीमा लवकरच ‘टेलर मर्डर स्टोरी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लाल साहूच्या हत्येवर आधारित असणार आहे. या चित्रपटात सीमा भारतीय रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, सीमानं हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल तिचं निर्माते अमित जानी यांनी भगवी शाल देऊन स्वागत केले. तसंच आता सीमा आणि चित्रपटाची टीम एटीएसच्या अहवालाची वाट पाहत आहे. या अहवालानंतर सीमा चित्रपटाचं शुटिंग सुरू करणार असल्याचं म्हटलं जातंय.