ताज्या बातम्यामनोरंजन

“…नाम तो सुना होगा”; शाहरुखच्या ‘जवान’चा अ‍ॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट

Jawan Prevue : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते त्याच्या जवान (Jawan) या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. इतक्यात शाहरुखनं काल जाहिर केलं होतं की जवानचा प्रिव्ह्यू प्रदर्शित होणार आहे. आता जवानचा प्रिव्ह्यू प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा प्रीव्यू सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

शाहरुखच्या ‘जवान’ (Jawan) या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. प्रीव्यूवरुन याचा अंदाज येत आहे. प्रीव्ह्यूची सुरुवात किंग खानच्या दमदार आवाजाने होत आहे. तो म्हणतो आहे,”मैं कौन हूँ, कौन नहीं, पता नहीं, ना तो कोई इरादा हूं. पुण्य हूँ या पाप हूँ ये खुद से पूछना क्योंकि मैं भी आप हूँ… रेडी… नाम तो सुना होगा”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये