अर्थताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

बॅक्स ऑफिवर फक्त शाहरुखच्या ‘पठाण’चा बोलबाला; चार दिवसांत जमावला 400 कोटींचा गल्ला!

Shah Rukh Khan Pathan Worldwide Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ची (Pathan) क्रेझ जगभरात दिसत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाने चार दिवसांत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार केला असून, जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 429 कोटींचा गल्ला जमवला आहे.

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम देखील (John Abrham) मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचे अनेक खास शो आयोजित करण्यात येत आहेत. टाळ्या, शिट्ट्या वाजवत चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहत आहेत. बॉलिवूडसाठी मागचं वर्ष खास नव्हतं. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरुखच्या ‘पठाण’ने बॉलिवूडला सुगीचे दिवस दाखवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये