ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

चाहत्यांसाठी खुशखबर! शाहरुख-रश्मीका जोडी एकत्र दिसणार; कारण मात्र वेगळच..

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि देशाची नॅशनल क्रश रश्मीका मंदाना स्क्रीन शेअर करणार असल्याचं वृत्त आहे. दोघांना पडद्यावर एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी खास ट्रिट असणार आहे. कुठल्या फिल्ममध्ये ते एकत्र काम करताना दिसणार जाणून घ्या.

सोमवारी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये शाहरुख रश्मीकासोबत एका फोटासाठी पोझ देताना दिसला. या फोटोनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं. यावरुन सोशल मीडियात नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला. अनेकांनी त्यांच्या जोडीला खूपच छान अशा प्रतिक्रिया दिल्या, तसेच दोघांना एकत्र काम करताना पाहण्यात मजा येईल, असंही म्हटलं आहे.

शाहरुख आणि रश्मीका ‘प्रभुजी प्युअर फूड’ या अॅन्ड फिल्ममध्ये अर्थात जाहिरातीत एकत्र काम करणार आहेत. या जाहिरातीचं शूट नुकतंच यशराज फिल्म्सच्या स्टुडिओत पार पडलं. यावेळी या दोघांचा फोटो घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये