ताज्या बातम्यारणधुमाळी

“…तेव्हा अजित पवारांना खरा धक्का बसेल”, शंभूराज देसाईंचा खोचक टोला

सातारा | Shambhuraj Desai On Ajit Pawar – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना (Shivsena) विरूद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना पहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, त्याचवेळी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असाही राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. यामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ घेत मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसंच, स्थानिक राजकारणावरून त्यांनी अजित पवारांना सूचक इशाराही दिला आहे. ते आज (24 सप्टेंबर) साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, “कुणी कुणाला गद्दार म्हणावं? अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या दोन खात्यांचा मी राज्यमंत्री होतो. मी दादांचं काम जवळून पाहिलं आहे. पण अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा की हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत”.

“अजित पवार सत्तेतून बाहेर गेल्यामुळे त्यांचं हे सगळं सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रावादीची काही मंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आल्यानंतर आम्हाला गद्दार म्हणायचं, हे सरकार लवकर पडणार अशी वक्तव्य करून त्यांच्यासोबतची माणसं थांबवण्याचं काम अजित पवार करत आहेत. पण 2024 च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात दूध का दूध, पानी का पानी होईल”, असा विश्वास देखील शंभूराज देसाईंनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, “एकेकाळी सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आठपैकी सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. आज आठपैकी चार आमदार शिवसेना-भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस निम्म्यावर आली आहे आम्ही जास्त बोलणार नाही. त्यामुळे 2024 मध्ये यापेक्षा वेगळं चित्र अजित पवारांना पाहायला मिळेल. तेव्हा त्यांना खरा धक्का बसेल”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये