शरद पवार हे गौतम अदानींच्या निवासस्थानी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अहमदाबाद | Sharad Pawar Meet Gautam Adani – शरद पवार (Sharad Pawar) हे गौतम अदानींची (Gautam Adani) भेट घेण्यासाठी त्यांच्या अहमदाबादमधील घरी पोहोचले आहेत. शरद पवार हे गौतम अदानींची भेट घेण्यासाठी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या अगोदर गौतम अदानींनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली होती. तर आता शरद पवार नेमक्या कोणत्या कारणासाठी अदानींची भेट घेत आहेत, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
शरद पवारांनी गौतम अदानींची त्यांच्या अहमदाबादमधील घरी जाऊन भेट घेतली. एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार हे अदानींच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
या आधी 20 एप्रिल 2023 रोजी गौतम अदानी आणि शरद पवार यांची मुंबईत भेट झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली होती. पवार आणि अदानींची ही भेट हिंडनबर्ग प्रकरणावरून झाली होती. तर आता पुन्हा एकदा शरद पवारांनी गौतम अदानींची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.