ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

…”म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं”; वेदांता प्रकल्पावरून शरद पवारांची खोचक टीका!

पुणे : (Sharad Pawar On State Government) वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे दुर्दैवी आहे, यावर त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणण्याचं आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर केली. आता चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचं सांगत पंतप्रधानांनी असा मोठा प्रकल्प दिला तर त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण एक लाख रोजगार देणारा आणि 1.54 लाख कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प गुजरातला जाणं हे महाराष्ट्र हिताचे नाही, असं ते म्हणाले.

“तळेगाव हा जो स्पॉट आहे , त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा परिसर ऑटोमोबाईलसाठी अनुकूल आहे. इथं जर हा प्रकल्प असता तर कंपनीला अधिक फायदेशीर झाला असता. त्यामुळे तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. महाराष्ट्रातून प्रकल्प जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे असं व्हायला नको होतं, अशी खंत शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना पुण्यात व्यक्त केली.

दरम्यान यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “महाविकास आघाडीने यावर काही निर्णय घेतला नाही असा आरोप करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे होते. तरीही ते असं बोलतात. फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाला अर्थ नाही. केंद्राची सत्ता हाती असण्याचे अनुकूल परिणाम काही राज्यांवर होत असतात. त्यामध्ये गुजरात आहे असं शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये