ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

मुंबईच्या प्रसिद्ध ‘बडे मियाँ रेस्टॉरंट’वर एफडीएची धाड, धक्कादायक बाब उघडकीस

मुंबई | FDA Raid – मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध ‘बडे मियाँ रेस्टॉरंट’वर (Bade Miya Kebab) अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) धाड टाकली. काल (13 सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास एफडीएनं या रेस्टॉरंटवर छापा मारला. 76 वर्षे जुन्या असलेल्या या फूड जॉइंटवर एफीडएची छापेमारी बऱ्याच वेळ सुरू होती. त्यानंतर तेथे एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंबईतील खाद्य प्रेमींचं आवडीचं ठिकाण असलेल्या ‘बडे मियाँ’च्या कुलाबा येथील आउटलेटला एफडीएच्या पथकानं भेट दिली. त्यावेळी तिथे फूड लायसन्स नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर तेथील काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती, एफडीएच्या अधिकाऱ्यानं दिली.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये जेवणात उंदीर आढळून आला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर एफडीएकडून मुंबईतील विविध हॉटेल्सची तपासणी केली जात आहे. यामध्ये एफडीए पथकानं बडे मियाँवर देखील छापेमारी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये