फडणवीसांचा गृहखात्यावरचा ताबा सुटतोय? पवारांपाठोपाठ राऊत बंधूंही यांनाही जिवे मारण्याची धमकी..
मुंबई : (Sharad Pawar, Sanjay Raut and MLA Sunil Raut Got Death Threat) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचं नवं सरकार स्थापन झालं. उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फणवीस यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे. मात्र, फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात धमकी आणि दंगलीच सत्र मोठ्या प्रमाणात सुरु झालं असल्याचा सुर विरोधकांनी आवळला आहे.
दरम्यान, आज सकाळी एक अज्ञात व्यक्तीकडून राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘राजकारण महाराष्ट्राचे’ असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पुढील तपास पोलिस करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून ज्या घटना घडत आहे, ते राज्याच्या गुप्तचर खात्याचं अपयश आहे. या घटना कशा घडतात. एवढा द्वेष धर्माधर्मात कुठून पेरला जातो? हे गृहखात्याला तपासण्यात अपयश आलं असल्याचं विरोधकांकडून बोललं जातं. त्यामुळे खरचं देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावरचं वचप निघत चालला आहे का? असा सवाल सामान्य नागरीक उपस्थित करत आहेत.