राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील भाषणात केलेल्या आरोपांवर शरद पवारांचे सडेतोड प्रतिउत्तर

बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील भाषणात केलेल्या टीकेला आता सडेतोड उत्तर दिलंय. शरद पवार म्हणाले की, ‘मी नास्तिक नाही, मात्र मी माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही.’ शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यांचा मंदिरातला फोटो बघितलाय का? असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.
राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क वरील भाषणानंतर त्यांच्यावर मनसे ही भाजपची बी टीम असल्याची टीका केली जात आहे.त्याबद्दल शरद पवारांना विचारले असता पवार म्हणाले की, भाजपविरोधात एकही शब्द ते बोलले नाहीत याचा अर्थ काय होतो.
पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिल आहे. ज्यात त्यांच्यावर कायम फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख शरद पवार करत असतात असा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलय, ते म्हणाले, कारण हे महापुरुषही शिवरायांचा आदर्श घेऊन काम करायची. मी परवाच्या अमरावतीच्या भाषणात 15 मिनिटं शिवरायांवरच बोललोय. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध होत आणि अजूनही आहे.
मस्जिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत असून 3 मे पर्यंत याच्यावर काहीतरी कारवाई करण्याबाबत सरकार निर्णय घेण्यात येईल. असंही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी केंलेल्या आरोपांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरेंच्या भाषणात महागाई आणि सर्व सामान्य यांचा उल्लेख किंचीतही नाही. राज्यात वीजेचा प्रश्न आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न आहे. यावेळी उष्णतेची लाट आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.