उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या मी तर….

मुंबई | उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मिडीयावर युद्ध सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घातल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर जोरदार हल्ला चढवलाय. हे प्रकरण नंतर महिला आयोगाकडेही पोहोचलं होतं. तिथून हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आहे. परंतु या प्रकरणावर मनसेने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी हटके प्रतिक्रिया दिली आहे.
शर्मिला ठाकरे एका कार्यक्रमासाठी काल पनवेलमध्ये होत्या. त्यावेळी त्यांना उर्फी जावेद प्रकरणावर प्रश्न विचारले असता त्यांना एका वेगळ्याच अंदाजात उत्तर दिले. शर्मिला ठाकरे म्हणतात, “मी पूर्ण कपड्यात फिरते… बाकीच्यांचे मला माहीत नाही”… एवढ बोलून त्यांनी याप्रकरणावर अधिक बोलणं टाळलं. शर्मिला ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेतून त्यांना या वादात रस नसल्याचं स्पष्ट दिसून आलं. तर, उर्फी जावेद प्रकरणावर मनसेकडूनही कुठे फारशी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे मनसे या वादाला महत्त्व देत नसल्याचं स्पष्ट झाल आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी काल या प्रकरणावर भाष्य केलं. चित्रा वाघ उर्फीला उद्देशून म्हणाल्या, तू तुझ्या घरात आणि स्टुडिओत उघडी नागडी राहा. लोकांसाठी हे राजकारण असेल पण माझ्यासाठी हा संस्कृतीचा प्रश्न आहे. मी वकील नाही पण मला कायद्याची तरतूद काय आहे हे माहीत आहे. संविधानाने सर्वांनाच अधिकार दिले आहेत. पण उर्फीने अंगात पूर्ण कपडे घातले पाहिजे. रस्त्यावर उघडं नागडं फिरणं, सार्वजनिक ठिकाणी चाळे करणं चालणार नाही. तुझ्या स्टुडिओत आणि घरात काय करायचे ते कर पण बाहेर काही करू नकोस. कोणता धर्म सांगतो बाई नागडी नाच ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.