“मी पूर्ण कपड्यांत…”, उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या

मुंबई | Sharmila Thackeray On Urfi Javed – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात चांगलाच वाद सुरू आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर मी कोणते कपडे घालावेत हे ठरवण्याचा मला अधिकार आहे, असं म्हणत उर्फीनं चित्रा वाघ यांच्या मागणीला धुडकावून लावलं आहे. तसंच चित्रा वाघ यांनी धमकी दिल्याचा आरोपही उर्फीनं केला आहे. याबाबत आता राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नवी मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.
शर्मिला ठाकरे या नवी मुंबईत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी सामन्याच्या आयोजकांचं कौतूकही केलं. त्यानंतर त्यांना पत्रकरांनी उर्फी जावेद प्रकरणावर एक महिला म्हणून तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना “मी पूर्ण कपड्यांमध्ये फिरते. बाकीच्यांचं मला माहिती नाही”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदसंदर्भातील भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. “या प्रकरणाचा वापर माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला जात आहे. तरीही मी घाबरत नाही. मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. मला लोक विचारत आहेत की, चित्रा वाघ उठली की उर्फीवर बोलते. पण मी उर्फीवर उठसूठ बोलत नाही. मला प्रश्न विचारले जातात, म्हणून मी उत्तरं देते. सार्वनजिक ठिकाणी कसलाही नंगटपणा नको, हा एकच मुद्दा मी मांडलाय. या राज्यात एका आईचा आवाज चित्रा वाघनं उचलला असेल तर त्यात वावगं काय?” असा सवालही चित्रा वाघ यांनी केला आहे.