शिल्पा शेट्टीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई | बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 च्या दशकात शिल्पा शेट्टीचे चित्रपट चांगलेच सुपरहीट ठरले होते. तसंच आता शिल्पानं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना तिच्या नवीन चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
‘केडी द डेविल’ (KD The Devil) या चित्रपटातून शिल्पा शेट्टी दाक्षिणात्या सिनेसृष्टीत आपली जादू दाखवण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी कन्नड सुपरस्टार ध्रुव सरजासोबत (Dhruva Sarja) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आज (22 मार्च) गुढीपाडव्यानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटातील शिल्पा शेट्टीचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. सध्या तिच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
‘केडी द डेविल’ हा चित्रपट गॅंगस्टरवर आधारित आहे. शिल्पा या चित्रपटात सत्यवतीच्या भूमिकेत दिसणार आहे. 1970 च्या दशकावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती केवीएन या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत करण्यात येत आहे. तसंच हा चित्रपट कन्नडसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.