ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची संपत्ती पाहून तुमचे डोळे पांढरे पडतील.

मुंबई : (Shinde Governments cabinet expansion) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेला खिंडार पाडलं. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदेंनी सरकार स्थापन केलं. विरोधकांकडून होणाऱ्या रोजच्या टिकेनंतर ३९ दिवसांनी राज्यामध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

दरम्यान, राजभवनावर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला शिंदे गट-भाजपमधील प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, मंत्रीमंडळ विस्तारामधील एका नावाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या या आमदाराची एकूण संपत्ती पाहून तुमचे डोळे नक्कीच पांढरे पडतील. कारण या आमदाराची एकूण संपत्ती आहे ४४ हजार २७० कोटी.

एवढ्या संपत्तीचे मालक असणारे भाजपाचे हे आमदार मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदारही आहेत. या श्रीमंत आमदाराचे नाव आहे मंगलप्रभात लोढा. लोढा हे मागील पाच वर्षांपासून देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायीकांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष असणारे आमदार मंगलप्रभात लोढा हे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या लोढा यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये