चैत्री एकादशीचे नेमके इतिहासकालीन शास्त्र आणि भावार्थ

पुणे ः एकादशीचा उपवास हे वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे व्रत. तथापि चैत्री एकादशी दिवशी श्री विठ्ठलाला एकादशीच्या उपवासाचा नव्हे, तर चक्क पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यापाठीमागे अध्यात्म आणि शास्त्राची भरभक्कम प्रभावळ आहे. परंतु सांप्रदायिक प्रचारकीत काही गल्लाभरू स्वयंघोषित महाराजांनी सोशल मीडियाच्या नावाखाली डॉलर मिळविण्याच्या नादात अशा अनेक परंपरांना छेद देत त्याचा विपर्यास करून टाकला आहे. परंपरा आणि शास्त्र समजून न घेता अशा अनेक गोष्टींना वेगळे वळण दिले जात आहे. जर हे वेळीच थांबले नाही तर चुकीचा इतिहास पुढे मांडला जाईल आणि खरी संस्कृती लोप पावेल… ! चैत्री एकादशीचे नेमके शास्त्र आणि त्याचा भावार्थ… !
त्याचे कारण म्हणजे विठ्ठलाची दोन वेळा पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. विजयनगर साम्राज्याच्या राजाने मूर्ती हंपीत नेली असता एकनाथमहाराजांचे पूर्वज भानुदासमहाराज यांनी परत पंढरपूरला आणली आणि दुसर्यांदा अफझलखानाचे आक्रमण महाराष्ट्रातील हिंदूंची मंदिरे, मूर्ती नष्ट करण्यासाठी झाले होते, तेव्हा विठ्ठलमूर्तीचे समस्त बडवे समाजाने देगावच्या पाटलांच्या विहिरीत सुरक्षितरीत्या सांभाळून ठेवली होती. अशा दोन वेळेला विठ्ठलमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय अन्य कोणतीही कथा किंवा स्वमनोगत व्यक्त करणे दूषणावह असून, मंदिर सरकारीकरणाचे हे परिणाम आहेत.