मादागास्करमध्ये मोठी दुर्घटना! IOGI गेम्सच्या उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू, 80 लोक जखमी

Madagascar | आफ्रिकन देश मादागास्करमध्ये (Madagascar) मोठी दुर्घटना घडली आहे. IOGI गेम्सच्या उद्घाटन समारंभात (IOIG Opening Ceremony) चेंगराचेंगरीत 12 लोकांचा मृत्यू झाला असून 80 लोक जखमी झाले आहेत. सध्या जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येतीये.
या दुर्घनेबाबत राष्ट्राध्यक्षांनी शोक व्यक्त केला आहे, तसंच त्यांनी जनतेला शांतता बाळगण्याचं आवाहन देखील केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मादागास्करमध्ये शुक्रवारी बारिया स्टेडियमवर इंडियन ओशन आयलँड गेम्सचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन समारंभासाठी सुमारे 50 हजार लोक आले होते, त्यामुळे स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला असून 80 लोक जखमी आहेत.
12 killed, 80 injured in Madagascar stadium stampede
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2023
Read @ANI Story | https://t.co/p01FGeZIbr #Madagascar #Stampede pic.twitter.com/ucce2Oyq74
दरम्यान, मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. तर सर्वांनी शांतता बाळगण्याचं आवाहन देखील राष्ट्रपतींनी केलं आहे.