ताज्या बातम्यामनोरंजन

शिव, सुंबूल आणि अर्चना ‘या’ नवीन शोमध्ये दिसणार एकत्र; रुबीना दिलैकनं पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली…

मुंबई | Rubina Dilaik – यंदा ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) हे पर्व चांगलंच गाजलं आहे. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तसंच याच स्पर्धकांपैकी आता शिव ठाकरे (Shiv Thakare), सुंबूल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) लवकरच एका नवीन शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. बिग बाॅसनंतर आता हे तिघे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. याबाबतची माहिती रूबीना दिलैकनं (Rubina Dilaik) एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

रूबीना दिलैकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हर्ष लिंबाचिया, करण कुंद्रा, पुनीत पाठक तेजस्वी प्रकाश, रूबीना दिलैक, अर्चना गौतम, शिव ठाकरे आणि सुंबूल तौकीर दिसत आहेत. हे सर्वजण काहीना काही टास्क करताना दिसत आहेत.

रुबीनानं हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “हास्यासोबत ही टाॅर्चरची वेळ आहे. हाऊसफुल बे-बी सोमवार ते रविवार रात्री 10 वाजता हा शो कलर्स टीव्हीवर प्रसारित होईल.” हा एक काॅमेडी शो असणार आहे. या शोचं नाव ‘एंटरटेनमेंट की रात हाऊसफुल’ असं आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार असून त्यांच्यासोबत काही मजेदार टास्क खेळले जाणार आहेत. तसंच हा शो 15 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दरम्यान, या शोमध्ये शिव, सुंबूल आणि अर्चना एकत्र दिसणार असल्यामुळे चाहते चांगलेच खुश आहेत. तसंच या तिघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुकही झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये