महाराष्ट्रमुंबई

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून धोक्याची घंटा

मुंबई: महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये पावसाचे आगमन झाल असून मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून(आयएमडी)देण्यात आला होता. पावसामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुढील २४ तासांत मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. याचबरोबर नागरिकांना सुरक्षित राहण्याचा देखील आवाहन करण्यात आल आहे.

तसंच येत्या २४ तासात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याच हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पालघर, रायगड या भागात पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल आहे यामुळे वहातुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी जुन्या, इमारती आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सर्वांनी काळजी घावी अस प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे.

दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर नाशिक, पालघर, रायगड, पुणे, सातारा, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ठाणे, रत्नागिरी, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये