शिवभक्तांसाठी महत्वाची बातमी! शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवनेरीवर जाणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
पुणे | श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393वा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.
राज्यात शिवजयंती साजरी (Chhatrapati Shivaji Maharaj)करण्याची तयारी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. अनेक शिवभक्त शिवनेरीवर (Shivneri Fort) जाऊन शिवजयंती उत्साहात सहभागी होणार आहे. आता राज्य सरकारने शिवप्रेमींना गिफ्ट दिले असून त्यादिवशी शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर टोलमाफी दिली आहे.
टोलमाफी कुठे असणार आहे?
खालापूर, खेड, राजगुरु नगर येथील टोल नाक्यांवरुन टोलमाफी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, या तिन्ही टोलनाक्यावर टोलमाफी देण्याची मागणी अनेक शिवप्रेमींनी केली. त्यानंतर पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यांशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा केली. तत्काळ त्यांना शिवभक्तांना 19 फेब्रुवारीला टोलमाफी देण्याची घोषणा केली.