ठाकरे गटाची मशाल यात्रेला पोलिसांची आडकाठी! मात्र, शिवसैनिकांनी पुर्ण केली मशाल यात्रा…
![ठाकरे गटाची मशाल यात्रेला पोलिसांची आडकाठी! मात्र, शिवसैनिकांनी पुर्ण केली मशाल यात्रा... Thackeray 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/10/Thackeray-2-780x470.jpg)
मुंबई : (Shivsainik Mumbai Police MASHAL YATRA) शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादात धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह हे चिन्ह दिलं. त्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर ठाकरे गटाकडून ठाण्यात मशाल यात्रा काढण्यात आली आहे.
दरम्यान, आता ही यात्रा दादरमध्ये पोलिसांनी कोणतेही कारण न देता अडवली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिक आणि पोलिसांत काही वेळ वाद निर्माण झाला होता. अखेरीस पोलिसांनी यात्रा पुढे जाण्यास परवानगी दिली. पोलिसांनी यात्रा अडवल्यामुळे काही काळा तणाव निर्माण झाला होता.
ठाकरे गटाची मशाल यात्रा शिवतिर्थावर पोहोचली आहे. पोलिसांनी अडवल्यानंतरही मशाला यात्रा दिवंगत मिनाताई ठाकरे यांच्या स्मारकाकडे निघाली आहे. विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासोबत कार्यकर्ते मशालयात्रा घेऊन निघाले आहेत. उद्धव ठाकरे गटाला नुकतचं मशाल हे पक्षचिन्ह मिळालं आहे. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.