३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : एेश्वर्या मिश्राचा गोल्डन धमाका

सिद्धान्त, अरहंत-जिनेशला स्केटिंगमध्ये सुवर्ण
अहमदाबाद : महाराष्ट्राच्या एेश्वर्या मिश्राने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यती सुवर्णपदक जिंकले. अॅथलेटिक्ससह महाराष्ट्राच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, टेनिस, स्केटिंग, फेन्सिंग, महिला कबड्डी, कुस्ती प्रकारात पदके जिंकली. टेनिसमध्ये पुरूष संघाला सुवर्ण तर महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला कबड्डीमध्ये सुध्दा उपविजेतेपदावर मिळाले. महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसी एकूण तीन सुवर्ण (स्केटिंगची पदके शुक्रवारी उशिरा झालेल्या स्पर्धांची आहेत.), दोन रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली.
अॅथलेटिक्स : महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शयतीत महाराष्ट्राच्या एश्वर्या मिश्राने नियोजनपूर्वक धावून ५२.६२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. एश्वर्याने ही शर्यत पळताना पहिल्या शंभर मीटरमध्ये वेग वाढवून आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. दुसरे सरल शंभर मीटर तीने स्ट्राईडिंग करून पूर्ण केले. तिसरे शंभर मीटर एश्वर्याने प्रतिस्पर्धी धावपटूंना एकएक करून मागे टाकूत पूर्ण केले आणि अंतिम शंभर मीटरमध्ये तीने धावण्याचा वेग वाढवून सर्वांना मागे टाकत अंतिम रेषा पार केली. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या डियेंड्रा व्हॅलेदारेसने ११.६२ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक संपादन केले. या शर्यतीत आंध्रप्रदेशच्या ज्योथ याराजीने १०० मीटर अंतर ११.५१ सेकंदात पूर्ण करून या स्पर्धेत वेगवान धावपटूचा मान संपादन केला. महिलांच्या ५००० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला कांस्यपदाची वादकावर समाधान मानावे लागले. संजीवनीने ही शर्यत १६ मि. ३९.९७ सेकंदात पूर्ण केली. सुवर्णपदक उत्तर प्रदेशच्या पारूल चौधरीने तर रौप्यपदक हिमाचल प्रदेशच्या सीमाने जिंकले.




टेनिस : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकले मात्र महिला गटात महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राने सेनादल संघाचा २-० असा सहज पराभव केला. या स्पर्धेत पदार्पण करणारा महाराष्ट्राचा चौदा वर्षीय खेळाडू मानस धामणे याने सेनादलाच्या फैजल कमर याला चुरशीच्या लढतीनंतर ३-६,६-३,७-५ असे पराभूत केले आणि महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ महाराष्ट्राचा अर्जुन कढे याने सेनादलाचा ईशात इक्बाल याच्यावर ६-३, ६-२ अशी सहज मात करीत महाराष्ट्राच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राला यजमान गुजरात संघाकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. एकेरीच्या पहिल्या लढतीत महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर हिने गुजरातच्या झील देसाई हिचा ६-४, ६-२ असा पराभव केला आणि महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र एकेरीच्या दुसऱ्या लढतीत ऋतुजा भोसले हिला भारताची अव्वल दर्जाची खेळाडू अंकिता रैना हिने ६-१,६-४ असे पराभूत करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. दुहेरीच्या निर्णायक लढतीत देसाई व रैना यांनी महाराष्ट्राच्या वैष्णवी व ऋतुजा यांना ६-४,६-० असे हरविले आणि संघास सुवर्णपदक मिळवून दिले.

टेनिस : पुरुषांच्या गटात सुवर्णपदक व महिलांच्या गटात रौप्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्र संघातील खेळाडू महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगांवकर, एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर व संघाचे व्यवस्थापक व मार्गदर्शक.
स्केटिंग : महाराष्ट्राच्या सिद्धांत कांबळेने स्पीड स्केटिंग प्रकारात तर पेयर्स व्हॅलेममध्ये अरहंन जोशी आणि जिनेश नानलने सुवर्णपदक जिंकले. याच प्रकारात याच गटामध्ये दर्श शिंदे आणि आर्येश होनराव जोडीने रौप्यपदक संपादन केले. सिद्धांत कांबळेने स्पीड स्केटिंग प्रकारामध्ये १० किमीची शर्यत १६ मिनिटांत पूर्ण केली.


दर्श शिंदे व आर्येश होनराव
कुस्ती : महाराष्ट्राच्या समीर पाटीलने ग्रीकोरोमनच्या ७७ किलो वजनी गटात ब्रॉंझपदक संपादन केले.
फेन्सिंग (तलवारबाजी) : अजिंक्य दुधारे याने इपी वैयक्तिक प्रकारात साखळी सामन्यात चांगल्या प्रदर्शन करून बाद फेरीत प्रवेश मिळवला. बाद फेरीमध्ये केरळच्या आलिशियोस जोशी यास १५-१४ गुणांनी अटीतटीच्या सामन्यात पराभव करून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीमध्ये छत्तीसगडच्या सर्जनविरूध्द ९-१५ गुणांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अजिंक्यला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीमध्ये पंजाबच्या उदयवीर सिंगविरूध्द ७-१५ गुणांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे गिरीशला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

अजिंक्य दुधारे व गिरीश जकाते
महिला कबड्डी : स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता ठरला. राष्ट्रीय विजेता असलेल्या हिमाचल प्रदेश संघाने महाराष्ट्र संघाला २७-२२ गुणांनी पराभुत केले. महाराष्ट्र संघाकडून विजयासाठी आंतरराष्ट्रीय रेडर सोनाली शिंगटे आणि पुजा यादवने सर्वाेत्तम कामगिरी केली. महाराष्ट्र महिला संघाने पहिल्यांदाच नॅशनल गेम्समध्ये पदकाचा बहुमान पटकाविला आहे. स्नेहल शिंदेचे कुशल नेतृत्व, सोनाली शिंगटे, पूजा यांची सर्वाेत्तम चढाई आणि अंकिता जगताप, रेखा यांच्या सुरेख पकडीच्या बळावर महाराष्ट्राला सामन्यागणिक विजयाची नोंद करता आली.
