ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने भरले दोन उमेदवारांचे अर्ज! काय ते वाचा सविस्तर

मुंबई : (Shivsena two candidate applications Andheri by-election) अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून ऋतुजा रमेश लटक यांनी उमेदवारी अर्ज भरण्यात आला असून संदीप राजू नाईक यांचाही डमी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. सध्याच्या कुरघोडीच्या राजकारणात ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज कुठल्या कारणास्तव अवैध ठरला, तर पोटनिवडणुकीतून बाहेर होण्याची नामुष्की टाळण्यासाठी ठाकरेंनी प्लॅन बी अवलंबल्याचे दिसून येत आहे.

ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अंधेरीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना नेत्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बरांनीही हजेरी लावली. अवघ्या एका मतदारसंघापुरती असलेली पोटनिवडणूक राज्यभरात चर्चेचा विषयही ठरल्याने ती दोन्ही बाजूने प्रतिष्ठेचीही झाली आहे. त्यामुळेच लटकेंना बॅकअप प्लॅन म्हणून संदीप नाईकांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला.

ऋतुजा लटके यांची उमेदवारी रोखण्यासाठी विरोधकांकडून मोठे राजकीय शह-काटशह खेळले गेले होते. महापालिकेतील लिपीक पदाच्या राजीनाम्यावरुनही मोठे राजकारण खेळले गेले होते. त्यामुळे लटकेंच्या उमेदवारी अर्जाची छाननी होताना कुठल्या कारणास्तव तो अवैध ठरला किंवा बाद झाला, तर पोटनिवडणुकीतून बाहेर पडण्याची नामुष्की टाळण्यासाठी ठाकरेंनी मोठी सावधगिरी बाळगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये