‘…मात्र बंटी पाटील सर्वांना पुरून उरले’- बाळासाहेब थोरात

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. या निकालानंतर महसूल मंत्री आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पार्टीने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र बंटी पाटील सर्वांना पुरून उरले. अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे की, “कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या निवडणुकीतील विजयासाठी मनापासून अभिनंदन. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, मात्र बंटी पाटील सर्वांना पुरून उरले. आजच्या विजयाने हे अधोरेखित झाले.”
“स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं आहे.