“माझ्या जन्मानंतर माझे वडील म्हणायचे हिला मारून टाका…”, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | Shocking Disclosure Of The Actress – सध्या अभिनेत्री पूजा चोप्रा ही तिच्या आगामी ‘जहां चार यार’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट 16 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तसंच या चित्रपटात स्वरा भास्कर, मेहर विज, शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पूजा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
नवभारत टाइम्सशी बोलताना पूजा म्हणाली, “माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील खुश नव्हते. त्यांना आधीच एक मुलगी होती. त्यामुळे त्यांना दुसरा मुलगा हवा होता. पण जेव्हा मी जन्मले आणि मुलगी झालीय हे कळलं, तेव्हा माझ्या वडिलांचा ताबा सुटला. माझे वडील म्हणायचे की, मला मुलगी नको, तर मुलगा हवा आहे. तुम्ही हिला अनाथाश्रमात नेऊन द्या, नाहीतर मारून टाका,” असं ते म्हणायचे.
पूजाला आधीच सात वर्षांची मोठी बहीण होती, नंतर दुसरी मुलगी झाल्यानं तिच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितलं की, मला मुलगी नको, मुलगा हवा आहे. एकतर हिला अनाथाश्रमात द्या किंवा मग मारून टाका. झालेल्या प्रकारामुळे पूजाची आई घाबरली आणि तिच्या मोठ्या बहिणीसह तिच्या माहेरी निघून आली. मुलींना वाढवण्यासाठी तिच्या आईने नोकरी सुरू केली. ती सकाळी कामावर जायची आणि रात्री उशिरा परत यायची. पूजा लहान होती, त्यामुळे जेव्हा तिला भूक लागायची आणि रडायची तेव्हा शेजारी राहणाऱ्या काकू तिला दूध पाजायच्या, असं पूजाने याबाबत खुलासा करताना सांगितलं आहे.