हनिमूनवेळी ‘पतीबद्दल’ समजली धक्कादायक गोष्ट; पत्नी पोहोचली पोलीस ठाण्यात
भोपाळ/ मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूरमधील हनिमूनला (Honeymoon) गेलेल्या महिलेला पतीची अशी गोष्ट समजली ज्यामुळे तिला धक्काच बसला. असा एका नवविवाहित महिलेनं आरोप आहे की, पतीला अनेक गंभीर आजार आहेत. जे लग्नापूर्वी सांगितले नव्हते. इतकच नाही तर पती नपुंसक (husband impotent) असल्याचं महिलेनं सांगितलं या आरोपानंतर एकच खळबळ उडाली.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एका नवविवाहित तरुणीनं आपला पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हनिमूनला गेल्यावर पती नपुंसक असल्याचे कळलं. लग्नाआधी कुटुंबीयांकडून जबरदस्तीने पाच लाख रुपये उकळल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. लग्नानंतर मुंबईत सासरच्या घरी गेली. जवळपास आठवडाभर तिथे राहिली. यानंतर पतीसोबत हनिमूनला गेली. तेव्हा संबंधित माहिती समजली. तिने हे सर्व सासरच्यांना सांगितले.
यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच घरातून हाकलून दिले. यानंतर तिने पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. नेहरूनगर भागात राहणाऱ्या नवविवाहितेचं फेब्रुवारीत लग्न झालं होतं. माहेरच्यांनी सासरच्या मंडळींना हुंडा म्हणून पैसे आणि सोने दिले. मात्र, नवविवाहितेनं मुंबईत राहणारा पती, सासू, मेहुणी आणि सासरे यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे.