हुर्रे! शाळेच्या गृहपाठाला मिळणार सुट्टी? शिंदे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
पुणे : मागील दोन वर्षे शाळकरी मुलं अभ्यास आणि गृहपाठापासून दूर झाले आहेत. ऑनलाईन वर्गांमुळे मुलांना मोबाईलच्या वापराची कामापेक्षा जास्त सवय झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे वही आणि पुस्तक घेऊन त्यांची सवय मोडलेली आहे. त्यावर पर्याय म्हणून राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.
लवकरच मुलांना आपल्यासोबत वही वापरण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याचबरोबर घरी गेल्यानंतर वेगळा अभ्यास करावा लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो. मात्र, मुलांचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करू घेतला जाणार आहे. मुलांना त्यांच्या पुस्तकातच अभ्यासासाठी कोरी पाने किंवा नोट्स मिळू शकतात. यामुळे मुलांना वेगळ्या वह्या घेऊन जाण्याची कमी गरज पडू शकते.
मुलांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशाप्रकारचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, अशा प्रकारच्या निर्णयावर मुलांचे पालक काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.