स्वानंदी टिकेकर ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत अडकणार लग्नबंधनात, पोस्ट शेअर करत दिली प्रेमाची कबुली; म्हणाली…

मुंबई | Swanandi Tikekar – अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली आहे. स्वानंदी ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. स्वानंदी ही ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची मुलगी आहे. तर नुकतीच स्वानंदीनं तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिनं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
स्वानंदीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तर स्वानंदीचा होणारा नवरा हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) आहे. लवकरच आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी लग्नबंधनात अडकणार आहेत.
स्वानंदीनं पोस्टमध्ये आशिषसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसंच हा फोटो शेअर करत कॅप्शमध्ये तिनं लव्ह आणि आमचं ठरलं असे हॅशटॅग दिले आहेत. स्वानंदीनं ही आनंदाची बातमी शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
दरम्यान, स्वानंदीचा होणार नवरा आशिष कुलकर्णी हा प्रसिद्ध गायक आहे. त्यानं 2008 मध्ये ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये भाग घेतला होता. तर 2020 मध्ये त्यानं ‘इंडियन आयडॉल’ सीझन 12 मध्येही भाग घेतला होता. त्याने अनेक म्युझिक बँडबरोबरही काम केलं आहे.