ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्र्यांच्या मुलानं दिली मला जीवे मारण्याची सुपारी, संजय राऊतांच्या आरोपानं खळबळ

मुंबई | Sanjay Raut – सध्या ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वाद चांगलाच चिघळला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप शिंदे गटावर केला आहे. तसंच कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

या प्रकरणी संजय राऊत यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांची नावं असल्याची माहिती आहे. या सर्वांकडून आपल्याला धोका असल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये