ताज्या बातम्यामनोरंजन

“मी लग्न केलं…”, कियाराशी लग्न करण्याच्या चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्राचं स्पष्टीकरण

मुंबई | Sidharth Malhotra – बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही जोडी चांगलीच चर्चेत असते. ते दोघं गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. यादरम्यान आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. लवकरच सिद्धार्थ आणि कियारा कोर्ट मॅरेज करणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच दिल्ली येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाचं सेलिब्रेशन होणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. यावर आता सिद्धार्थ मल्होत्रानं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राला लग्नाच्या चर्चांबाबत विचारलं असता तो म्हणाला, “जर मी लग्न केलं तर त्यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. माझं लग्न होणार आहे आणि सत्य हेच आहे की हे सगळं आम्ही गुपित ठेवू शकत नाही.”

दरम्यान, यापूर्वी सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची बरीच वृत्त समोर आली होती. मात्र आता सिद्धार्थच्या या प्रतिक्रियेनंतर या सर्व अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ- कियारा नेमकं कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये