‘Sidharth-Kiara’ चा शाही विवाह सोहळा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसण्याचे संकेत
Sidharth Kiara Wedding : मागील वर्षापासून एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीची लगीनघाई सुरू आहे. कियारा-सिद्धार्थ 6 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणर आहेत. विशेष म्हणजे त्यांचा विवाहसोहळा आता सगळ्यांना घरातून पाहता येईल अशी चर्चा होत आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. हा शाही विवाहसोहळा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल अशी शक्यता वर्तवली जात होती कारण अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र इंडिया टुडेला मिळालेल्या सिद्धार्थ कियाराच्या विवाह सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे हक्क अमेझॉन प्राईमला विकलेले नाहीत. त्यांनी केवळ एक पोस्ट शेअर केली आहे. असे सांगण्यात आले.