महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार?
मुंबई : (Shivsena And BJP Government On Maharashtra) राज्यात सध्या राजकीय घटनांनी एवढा वेग घेतली आहे की, चांगल्या-चांगल्या राजकीय विश्लेकांना आंदाज लागणे आवघड झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकिय निवासस्थान सोडून मातोश्री गाठली आहे. शिवसेना आणि बंडखोर यांच्यात आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. त्यातच आता बंडखोरांनी माघार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे.
दरम्यान, बंडखोरांचे प्रवक्त्य दिपक केसरकर हे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच असून कोणीही मातोश्रीवर कोणतेही आरोप करु नयेत. महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार असल्याचा विश्वास देखील यावेळी केसरकरांनी व्यक्त केला आहे. आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांबाबत नितांत आदर असून आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे. जनमताच्या कौलाप्रमाणं राज्यात युतीच सरकार हवं होतं, पण तसं झालं नाही, अशी खंत देखील केसरकारांनी व्यक्त केली आहे.
ठाकरे साहेबांचे राष्ट्रवादीतील काहीजण सल्लागार आहेत. हे सल्लागार त्यांना चुकीचा मार्ग दाखवत आहेत. आमच्या नाराजीवर आधी मार्ग काढला असता, तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सध्या शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी १०-१२ आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढं जात आहोत. आमच्यावर गद्दाराचेही आरोप करण्यात आले आहेत. हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करत यावेळी केसरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.