… म्हणून पुण्यात राष्ट्रवादी आणि ब्राह्मण महासंघात धक्काबुक्की
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीमध्ये झालेल्या सभेत धार्मिक विधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येत आहे. यामुळे आज पुण्यातील ब्राम्हण महासंघानं राष्ट्रवादी कॉग्रेस च्या ऑफिस समोर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनानंतर पुण्यासह सर्वत्र याप्रकरणी वातावरण तापलं आहे.
तसेच मिटकरींनी कन्यादान विधींबाबत चुकीचं वक्तव्य केलं यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तर हिंदू समाजाचा अपमान केला असल्याचा आरोपही ब्राम्हण महासंघानं केलं. तर मिटकरींच्या समर्थ करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हि रस्त्यावर उतरले असून राष्ट्रवादी आणि ब्राम्हण महासंघ यांच्यात धक्काबुक्की झाल्याचंही पाहायला मिळालं.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी बुके देऊन चांगलाच समाचार घेतला यामुळे सकाळपासून सुरु असलेलं ब्राह्मण महासंघाचं आंदोलन चांगलंच तापलं आहे.