देश - विदेश
गोपीचंद पडळकर यांच्या भावाचा भीषण अपघात…

सांगली: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू सांगली जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातात ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
विटा कुंडल रोडवर हा अपघात झाला. एका कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुढ्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. जखमींना विट्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोपीचंद पडळकर साताऱ्याचा दौरा अर्धवट सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत.