देश - विदेश

…म्हणून भाजप नेत्यासाठी तीन राज्यांचे पोलिस आमने-सामने

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष नेते तजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातुन अटक केलं. प्रक्षोभक भाषण करणं, धार्मिक द्वेष पसरवणं आणि गुन्हेगारी धमकी देणं हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर आज पंजाब, हरयाणा आणि दिल्ली या तीन राज्यांचे पोलिस कुरुक्षेत्र इथं आमनेसामने आले होते. अखेर दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सोडवून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याच्या आरोपाखाली बग्गा यांना अटक करण्यात आलं आहे, असं आम आदमी पक्षाच्या आमदारांनं सांगितलं आहे. बग्गा यांना तपासात सहभागी होण्यासाठी पाच नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. पण, ते जाणीवपूर्वक तपास टाळत होते. त्यामुळे त्यांना आज त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली, असं पंजाब पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये