ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

मुलीच्या हट्टापायी ‘ती’ने गायले गाणं अन् थेट सोनू सूदकडून मिळाली गाण्याची ऑफर

सध्या सोशल मीडियावर दररोज अनेक नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामुळे काही लोक रातोरात स्टार झाल्याचे आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे. व्हायरलमुळे लोकांना चुटकीसरशी लोकप्रियता मिळते आणि ते लोकप्रियतेच्या शिखरावर चढतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आई मुलीच्या हट्टापायी बॉलिवूडचं गाणं गाताना दिसत आहे. या आईचे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. तसंच या महिलेच्या गाण्याचे अभिनेता सोनू सूद यानेही कौतुक केले आहे. शिवाय त्याने आपल्या चित्रपटात गाणे गाण्यासाठी ऑफर देखील दिली आहे.

एका महिलेची मुलगी तिला गाणे गाण्यासाठी आग्रह करताना दिसते. मुलीच्या हट्टापायी आई गाणे गाण्यास तयार होते. आपल्या आईचे गाणे ती मुलगी स्वतःहा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. ही महिला किशोर कुमार यांचं ‘मेरे नैना सावन भादो” हे गाणे गाताना दिसत आहे. या महिलेचा आवाज ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. कुठल्याही वाद्यशिवाय तिने गायलेले गाणे ऐकून काहीजणांना यावर विश्वासच बसत नाहीये.

त्यानंतर सोनू सुदने थेट या महिलेला आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर दिली आहे. सोनू म्हणतो की, ‘तुम्ही मला फोन नंबर पाठवा, माझ्या पुढील चित्रपटात तुम्ही गीत गाणार आहात”. महिलेला ऑफर दिल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावर एकाने कंमेंट करत म्हटलंय की, तू भारताचा सुपरहिरो आहेस.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये